SHRI.TEKE.EYE. CLINIC & SIGHT CCARE SOCIETY, SANGLI
आपणास सर्वांना कल्पना आहे की SHRI.TEKE.EYE.CLINIC & SIGHT CCARE SOCIETY सांगली ही एक सेवाभावी संस्था असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर सन 2025 पासून अविरतपणे समाजसेवेचे कार्य करत आहे. समाजातील गरीब व गरजू नेत्ररुग्णांना संपूर्णपणे मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून देणे ही आमची सामाजिक बांधिलकी असून, त्याच भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
नेत्ररुग्णांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा देणे, त्यांची योग्य काळजी घेणे तसेच त्यांना उत्तम दृष्टी देण्याचे कार्य आमची अनुभवी व समर्पित टीम सातत्याने करत आहे. SHRI.TEKE.EYE.CLINIC.& SIGHT CCARE SOCIETY, SANGLI प्रतिष्ठानद्वारे संचालित SHREE TEKE EYE HOSPITAL सांगली येथे संचालक मंडळाने उपलब्ध करून दिलेला नेत्रसेवा प्रतिष्ठानचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागामध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (OPD), स्वतंत्र आंतररुग्ण विभाग (IPD) तसेच सुसज्ज ऑपरेशन थिएटर (OT) उपलब्ध आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी सदैव रुग्णसेवेसाठी उपस्थित असतात.
सातत्यपूर्ण गुणवत्तावृद्धी करणे हे आमच्या नेत्रसेवा सा प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार SHREE TEKE सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नेत्रशिबिरांचे योग्य नियोजन व आयोजन कसे करावे याचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे सेवेमध्ये सातत्य व गुणवत्ता दिसून येते.
यामध्ये Community Partner या संकल्पनेअंतर्गत नेत्रशिबिरांच्या आयोजनासाठी विविध सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यासाठी SHREE TEKE EYE HOSPITAL सर्व डॉक्टर व संचालक मंडळाचे आभार मानणे आवश्यक आहे.